ऐकून हे - झलक
(22 downloads)Download this episode (29 sec)
Posted by Tushar Joshi at 12:17 PM | MAKE A COMMENT
Tuesday, May 20, 2008तू चालत रहा - नाम काकांची भन्नाट कविता
(59 downloads)Download this episode (2 min)
नाम काकांच्या सळसळत्या कवितेचे हे वाचन
तू चालत रहा
Posted by Tushar Joshi at 9:55 AM | MAKE A COMMENT
Saturday, May 17, 2008तडप तडप के इस दिल को
(29 downloads)Download this episode (4 min)
तडप तडप के इस दिल को...
.
.
निष्प्राण आयुष्याला
तू संजिवन दिले
पण तुझ्या प्रेमातच
हृदय हे खंगले
तुटता तुटता
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची
अजब हे प्रेम सखये
सुख हे दो घडीचे
भरभरून दुःखाचा पाऊस
अंधार एकटेपणाचे
कधी रडतो कधी चिडतो
कधी खचतो कधी कुढतो
तुझा चेहरा दिसतो गं
तुझा चेहरा दिसतो गं
मला दिवसा प्रकाशात
तुझी स्मरणे छळतात
तुझी स्मरणे छळतात
रात्रीच्या अंधारात
तुझा चेहरा दिसतो गं
झुरता झुरता
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची
देव भेटला तो
विचारेन का रे?
मातीचा पुतळा घडवला
काचेचे हृदय कशाला रे?
आणि त्याला दिली हिम्मत
प्रेमातच पडण्याची
बघतो तू कशी गम्मत
बघतो तू कशी गम्मत
नशिबाने मीलनाची
विरहाची ही करामत
विरहाची ही करामत
प्रेमाची अशी किम्मत
बघतो तू कशी गम्मत
हुंदक्यातच
हृदयातुन ओघळली वेदना
शिक्षा मला ही प्रीतीची
काय केला मी गुन्हा
की संपलो मी संपलो
संपली कहाणी ही प्रेमाची
-----------------------------------------------------------------------------------
गीत: तडप तडप के इस दिल को
चित्रपट: हम दिल दे चुके सनम
गायक: डोमिनिक
संगितकार: इस्माईल दरबार
गीतकार: मेहबूब
मराठी स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
-----------------------------------------------------------------------------------
http://www.esnips.com/doc/685af37e-8024-4264-b3c1-94a8338b6e80/44-Tadap-Tadap-Ke
Posted by Tushar Joshi at 9:22 AM | MAKE A COMMENT
Saturday, May 17, 2008या रब्बा - मराठी अनुवाद (प्रथम प्रत)
(26 downloads)Download this episode (7 min)
या रब्बा दे दे कोई जान भी अगर
.
.
प्रीत की भोग हा सांग ना रे मना
वाढते का अशी प्रीतीची वेदना
प्रीतीसाठी कितीदा परिक्षा द्यायच्या
ही प्रीत गिरवते रोज कहाण्या या अशा
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
कुठे रसता मनांच्या जुळण्याचा
सोडवू कसा पीळ हा नशिबाचा
हदया मध्ये रुसवे साचले
माझे सुख ही मजला बोचले
कण्हते कुणी कुणी गा-याणे सांगते
मृगजळ पाहूनिया सैरभैर कुणी धावते
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
ऐकते ना कुणी निश्वासांना
आधार कुठे आर्जवी बाहूंना
अरधी मुरधी इच्छा बापुडी
तुटकी फुटकी स्वप्नांची जुडी
संशय कुठे कुठे द्वेषाचे घोळके
यश येता मागुन अपयश होते बोलके
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
विचारू नका वेदनावंतांना
सुख कसले हसणे कसले
संकट डोईवर राहतेच
कधी कसले कधी कसले
.
भगवंता ओतला जीव मी जरी
पडतच नाही काही फरक सखयावरी
.
----------------------------------
गीत: या रब्ब दे दे कोई जान भी अगर
चित्रपट: सलामे इश्क
संगीत: शंकर एहसान लॉय
गायक: कैलाश खेर (मराठी - सुबोध साठे)
गीतकार: समीर
मराठी स्वैर अनुवाद: तुषार जोशी, नागपूर
----------------------------------
.
.
यू ट्यूब: http://www.youtube.com/watch?v=5tz8TBZogEw
मूळ गीत: http://www.lyricsmasti.com/song/2111/get_lyrics_of_Ya-Rabba.html
Posted by Tushar Joshi at 8:30 AM | 2 comments
Thursday, May 08, 2008भास - तुषार जोशी
(22 downloads)Download this episode (3 min)
कविता: तुषार जोशी, नागपूर
आवाज: सुबोध साठे, नागपूर
Posted by Tushar Joshi at 10:06 AM | MAKE A COMMENT
My Profile
Tushar Joshi
Nagpur, Maharashtra
View my complete profile
Links
Recent Posts
शब्द बोलून झाले - हर्षल पाटील ची गजल अशी गोड तू - first stanza raw version by Subodh बायको आणि यम.. चंद्रजीत ची कविता तू अशी कशी सगळं सांगणार आहे Tarana - Voice: Subodh Lyrics: Tushar कोण रे मी - सोनाली ची कविताArchives
Jul 2008May 2008
Nov 2007 Oct 2007 Sep 2007 Jun 2007 May 2007 Apr 2007 Mar 2007 Feb 2007



